

MPSC Committee Report on Competitive Exam Reforms Draws Student Criticism Over Lack of Strong Measures Against Paper Leaks
esakal
-प्रज्वल रामटेके
पुणे : राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीकडून ठोस आणि धोरणात्मक सुधारणांच्या शिफारसींची अपेक्षा होती. मात्र, समितीने समूळ उपाययोजना सुचवण्याऐवजी केवळ मलमपट्टी करण्यावर भर दिला आहे. समितीने सादर केलेल्या अंतरिम (प्राथमिक) अहवालात केवळ जुन्याच मागण्यांचा समावेश असल्याने समितीकडे आशेने पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.