MPSC paper leak fallout: एमपीएससीच्या पेपरफुटी निर्णयाने प्रामाणिक विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली

पेपरफुटीच्या आरोपावरून संपूर्ण परीक्षा रद्द; प्रामाणिक उमेदवारांच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षावर एका निर्णयाने पाणी, ‘दोषींना शिक्षा करा पण आमचे भविष्य वाचवा’ अशी विद्यार्थ्यांची हाक
MPSC Decision to Cancel Drug Inspector Exam Shatters Dreams of Hundreds of Candidates

MPSC Decision to Cancel Drug Inspector Exam Shatters Dreams of Hundreds of Candidates

Sakal

Updated on: 

प्रज्वल रामटेके

पुणे : आईने अभ्यासाला लॅपटॉप घेण्यासाठी गोठ्यातील शेळ्या विकल्या... कुणी मुलाखतीच्या तोंडावर आयसीयूत असलेल्या वडिलांच्या निधनाचे दुःख पचवून पुस्तकात डोके खुपसले... तर कुणी डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी स्वतःच्या तारुण्याचा बळी दिला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गुणवत्ता यादीत नाव झळकले आणि विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अधिकारी झाल्यानंतरचे सुखाचे दिवस जवळ येऊन ठेपले होते. मात्र ‘एमपीएससी’च्या एका अधिसूचनेने ही सारी स्वप्ने उध्वस्त झाली. कारण ‘पेपरफुटी’चा ठपका ठेवत संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com