
PMC Elections
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली आहे. प्रारूप प्रभागरचनेत काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे, तर काही ठिकाणी राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ही प्रभागरचना अंतिम झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या नजरा आता आरक्षणाच्या सोडतीकडे लागल्या आहेत.