

MPSC Group B and C Prelims Date Announced
Sakal
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २१ डिसेंबर रोजी नियोजित असलेली ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची दखल घेत आयोगाने परीक्षा पुढे ढकलली असून आता ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर झाल्याने त्यांनी याविषयी समाधान व्यक्त केले आहे.