
Education News
sakal
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ आणि ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’द्वारे (एनटीए) घेण्यात येणारी यूजीसी-नेट डिसेंबर २०२५’ परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी असल्याने नेमकी कोणती परीक्षा द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.