MPSC Group C Exam Candidates Can Update Reservation Claims
esakal
प्रज्वल रामटेके : सकाळ वृत्तसेवा
पुणे : ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’मार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६’ साठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आरक्षण आणि शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील माहिती अद्ययावत करण्याची संधी देण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, नॉन क्रिमिलेअर लेयर (एनसीएल) आणि अधिवास प्रमाणपत्रासंबंधीच्या नोंदींमध्ये सुधारणा करता येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी उमेदवारांना यापूर्वी सादर केलेला अर्ज रद्द करून नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.