

MPSC increases Group C recruitment vacancies to 16,717 and postpones the preliminary examination to January 24.
esakal
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६ पुढे ढकलली आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३ जानेवारीला होणारी ही परीक्षा आता २४ जानेवारीला घेण्यात येणार आहे. दरम्यान, या परीक्षेतील पदसंख्येत मोठी वाढ केली असून, यापूर्वीच्या ५ हजार ७०७ पदांमध्ये आणखी ११ हजार १० पदांची भर पडली. त्यामुळे एकूण १६ हजार ७१७ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वाढीव पदांमुळे नव्याने अर्ज स्वीकारणे आणि पात्र उमेदवारांना संवर्गाचे विकल्प देण्यासाठी आयोगाने १३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान मुदत दिली.