

MPSC Ecam
- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा २०२५ मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती अचानक पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मुलाखतीच्या टप्प्यावर पोहोचलेल्या उमेदवारांना या निर्णयामुळे अनिश्चिततेला सामोरे जावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुलाखतींचे सुधारित वेळापत्रक विनाविलंब जाहीर करून निवड प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी पात्र उमेदवारांनी केली आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले आहे.