

MPSC Geologist Result 2025
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कनिष्ठ भूवैज्ञानिक भरती प्रक्रियेचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये नैराश्य पसरले आहे. वरिष्ठ व सहाय्यक भूवैज्ञानिक पदांचे निकाल जाहीर झाले. मात्र, सर्वाधिक पदे असलेल्या कनिष्ठ भूवैज्ञानिक संवर्गाचा निकाल अद्याप प्रलंबित ठेवल्याने उमेदवारांनी आयोगाच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याविषयी आयोगाशी संपर्क साधला असता, ‘‘निकालाचे काम सुरू आहे, लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल,’’ असे सांगण्यात आले.