
MPSC Exam Update
Sakal
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेद्वारे शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रियेत एक मोठा आणि निर्णायक बदल जाहीर केला आहे. आता उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीच्या वेळी न करता, अर्ज सादर करण्यापूर्वीच केली जाणार आहे. यामुळे अनेकदा खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या प्रकरणांना आता आळा बसणार आहे. ‘एमपीएससी’ने या संदर्भात नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.