

“System has flaws,” admits MLA Vikram Pachpute amid MPSC row.
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा एक पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांच्या मनात इतरही पेपर फुटले असण्याची रास्त शंका निर्माण झाली आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नकारात्मकता वाढत आहे. ‘ही व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे’, हे आता सिद्ध होत असून, सरकारचा एक घटक म्हणून आम्हीही ते मान्य करतो, अशी स्पष्ट कबुली आमदार विक्रम पाचपुते यांनी मंगळवारी पुण्यात दिली.