MPSC Drug Inspector exam paper leak rumours denied by Maharashtra Public Service Commission
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या ‘औषध निरीक्षक’ (गट ब) पदाच्या भरती परीक्षेत पेपरफुटी आणि मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भातील दावे वेगाने व्हायरल होत असून, एमपीएससी आणि अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) याप्रकरणी अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, ‘एमपीएससी’ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, आयोगाची बदनामी करणाऱ्या आणि अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल, असा कडक इशाराही दिला आहे.