
पुणे : राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) औषध निरीक्षक पदांच्या भरतीसाठी गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहणाऱ्या हजारो फार्मसी विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) औषध निरीक्षक पदांसाठी १०९ पदांची जाहिरात अखेर प्रसिद्ध झाली आहे. ‘सकाळ’ने यासंदर्भात विद्यार्थ्यांचा आवाज राज्य सरकारपर्यंत पोहोचविल्यामुळे ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याने राज्यभरातील फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.