

MPSC Result
sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या ‘राज्यसेवा परीक्षा-२०२४’ परीक्षेच्या निकाल प्रक्रियेत मोठा घोळ असल्याचा आरोप करत, विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या परीक्षेची पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तीनही प्रक्रिया पूर्ण करूनदेखील काही विद्यार्थ्यांचे सामान्य गुणवत्ता यादीत नाव नसल्याची बाब समोर आली आहे.