‘राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९’चा सुधारित अंतिम निकाल जाहीर
‘राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९’चा सुधारित अंतिम निकाल जाहीरsakal

‘राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९’चा सुधारित अंतिम निकाल जाहीर

आयोगाच्या मुख्य परीक्षेत ‘इंजीनिअर्स’ अग्रक्रमावर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक राज्य कर आयुक्त अशा पदांसाठी जुलै २०१९मध्ये घेतलेल्या ‘राज्य सेवा (मुख्य) परीक्षा -२०१९’चा सुधारित निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत कऱ्हाड येथील प्रसाद चौगुले हे सर्वसाधारण वर्गवारीतून, मालेगाव येथील रोहन कुवर हे मागास प्रवर्गातून पहिले आले आहेत. तर महिलांमधून जळगावमधील मानसी पाटील राज्यात पहिल्या आल्या आहेत.

आयोगाने उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपशिक्षणाअधिकारी, सहाय्यक कर आयुक्त, कक्षाधिकारी, नायब तहसिलदार अशा एकूण ४२० पदांसाठी १३ ते १५ जुलै  २०१९ या कालावधीत ही परीक्षा घेतली होती. जून २०२०मध्ये मुलाखती घेऊन अंतिम निकाल जाहीर केला होता. त्यात काही उमेदवारांची निवडही करण्यात आली. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाकरिता आरक्षित असलेली पदे अराखीव (खुल्या) पदांमध्ये रुपांतरित केली आहेत. त्यानुसार हा सुधारित अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

‘राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९’चा सुधारित अंतिम निकाल जाहीर
एफआरपीसाठी रयत क्रांती संघटनेने वेधले भजन आंदोलनाने लक्ष

उमेदवारांचा सुधारित निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरिता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (कट ऑफ) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास, अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पदध्तीने अर्ज करणे आवश्यक आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे

‘‘मुळचा सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडमधील असून येथूनच मेकॅनिकल इंजीनिअरिंगचे पदवी शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एक वर्ष नोकरी केली आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात आलो. पहिल्या प्रयत्नात यश मिळाल्याचा आनंद आहे. तसेच २०१९मध्ये झालेल्या परीक्षेचा सुधारित अंतिम निकाल सप्टेंबर २०२१मध्ये जाहीर होत असल्याने आता प्रत्यक्ष नियुक्त्या लवकर होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने हा आनंद द्विगुणित झाला आहे.’’

- प्रसाद चौगुले (सर्वसाधारण प्रवर्गातून पहिले आलेले उमेदवार)

‘राज्य सेवा मुख्य परीक्षा २०१९’चा सुधारित अंतिम निकाल जाहीर
पिंपरी : अन् शरीरावर डोकंच नसल्यासारखं वाटतंय...

‘‘मुळचे मालेगाव येथील असून २०२० मध्ये जाहीर झालेल्या रॅक सुधारित निकालातही सारखीच आहे. परंतु अनेक उमेदवारांना सुधारित निकालामुळे फायदा झाला आहे. हा निकाल जाहीर झाल्याने आता प्रत्यक्ष नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. मी राज्यशास्त्रात पदवी अभ्यासक्रम केला असून नोकरी करता-करता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असून पाचव्या प्रयत्नात मला यश आले आहे.’’

- रोहन कुवर (मागास प्रवर्गातून पहिलेले आलेले उमेदवार)

‘‘मी मुळची जळगावमधील असून माझे शिक्षण येथेच झाले आहे. कॉम्प्युटर इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले असून जळगाव, नागपूर आणि पुणे येथून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे. मागील निकालात मी महिला प्रवर्गातून दुसऱ्या क्रमांकावर होते, आता महिला प्रवर्गात पहिल्या क्रमांकावर आले आहे.’’

- मानसी पाटील, (महिला प्रवर्गातून पहिलेल्या आलेल्या उमेदवार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com