Pune News: ‘एमपीएससी’ला निकालाचा मुहूर्त मिळेना; पंचाण्णव दिवसांनंतरही विद्यार्थ्यांना प्रतीक्षा, मुख्य परीक्षा तोंडावर!

MPSC Aspirants waiting for Prelim Result Clarification: एमपीएससीच्या निकालाच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम; मुख्य परीक्षेची तयारी संकटात
MPSC aspirants await official announcement as result delay crosses 95 days ahead of mains exam.

MPSC aspirants await official announcement as result delay crosses 95 days ahead of mains exam.

Sakal

Updated on

पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विश्‍वात एकेक दिवसाचे महत्त्व असते. तिथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) तब्बल ९५ दिवस घालवले. ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५’ होऊन तीन महिन्यांहून अधिक काळ लोटला, तरी आयोगाला निकालाचा मुहूर्त सापडला नाही. नियोजित वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा तोंडावर आली असताना, आयोगाच्या ‘तुघलकी’ कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. निकालच हातात नसल्याने मुख्य परीक्षेला सामोरे जायचे कसे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com