mpsc student agitation in pune
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - एमपीएससी परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकार आणि पारदर्शक परीक्षा पद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा बुधवारी (ता. ७) सातवा दिवस होता. आंदोलनस्थळी दिवसभर विद्यार्थ्यांची गर्दी, घोषणाबाजी, नेत्यांची भाषणे आणि सरकारसोबतच्या चर्चेबाबतची उत्सुकता असे वातावरण होते.