MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
MPSC Students Protest in Pune Over Irregularities

MPSC Students Protest in Pune Over Irregularities

sakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - ‘विद्यार्थी एकजुटीचा विजय असो...’, ‘एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतलाच पाहिजे...’, ‘इंकलाब जिंदाबाद’, ‘भारत माता की जय’, ‘तानाशाही नही चलेगी’, अशा घोषणांनी सोमवारी पुण्याच्या मध्यवर्ती भागाचा परिसर दणाणून गेला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) कथित पेपरफुटी, गैरप्रकार आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. ‘एमपीएससी’च्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, सर्व स्पर्धा परीक्षांचे स्वतंत्र ऑडिट करून गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. सरकारने तीन दिवसांत मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com