MPSC Students Suspend Agitation at Tilak Chowk Following High Court Directives
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) परीक्षांसाठी वर्णनात्मक (डिस्क्रिप्टिव्ह) पद्धत कायम ठेवण्याच्या मागणीसाठी पुण्यातील टिळक चौकात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर बुधवारी (ता. ७) स्थगित करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि न्यायव्यवस्थेचा मान राखत हे आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी स्पष्ट केले.