
Pune News : मिसेस नारायणगाव २०२२" किताब प्रतिभा गावडे यांनी पटकाविला
नारायणगाव : इंद्रधनु महिला ग्रुपच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या मिसेस नारायणगाव सौंदर्य स्पर्धे अंतर्गत " मिसेस नारायणगाव २०२२" हा किताब प्रतिभा गावडे यांनी पटकाविला. या स्पर्धेत अठ्ठावीस महिलांनी भाग घेतला होता.
येथील जयहिंद मंगल कार्यालयात शनिवारी(ता.२४) रात्री या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन इंद्रधनु महिला ग्रुपच्या संस्थापक , माजी जिल्हा परिषद सदस्या राजश्री बोरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी इंद्रधनु ग्रुपच्या अध्यक्षा भारती खिवंसरा, सचिव शितल ठुसे, उपाध्यक्ष पुष्पा जाधव, उद्योजक सुरेश वऱ्हाडी, लाला बँकेचे संचालक अशोक गांधी, डॉ. संदीप डोळे, डॉ.स्मिता डोळे, नीता बोरा आदी उपस्थित होते.
पेहराव, जनरल नॉलेज परीक्षा, वक्तृत्व आशा तीन टप्प्यात स्पर्धेचे मूल्यमापन करण्यात आले. सहभागी स्पर्धकांना शेतकरी, कुटुंब, आरोग्य, शिक्षण, प्रेम , मोबाईल आदी दहा विषयावर मत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली होती.सर्वाधिक गुण मिळवून प्रतिभा गावडे यांनी मिसेस नारायणगाव २०२२ हा मानाचा किताब पटकविला.अंजनी महिला उद्योगाच्या संस्थापिका गौरी बेनके राजश्री बोरकर , प्रजापिता संगीता बहिणजी यांच्या हस्ते प्रतिभा गावडे यांना मुकुट, साडी , ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे स्वीटी पवन फुरसुंदर ,डॉ.पूजा गायकवाड यांचा आला.
उत्तेजनार्थ बक्षीस तेजल शुभम बडेरा, स्नेहल अभय कसाबे यांना विभागून देण्यात आले. परीक्षण अनुपमा पाटे,शिल्पा जगदाळे यांनी केले. निवेदन व सूत्रसंचालन अभय वारुळे शितल ठुसे यांनी केले.स्पर्धेचे नियोजन इंद्रधनु ग्रुपच्या सचिव शितल ठुसे,अध्यक्ष भारती खिवंसरा, पुष्पा जाधव , उपाध्यक्ष पुष्पा जाधव,संचालिका सुरेखा वाजगे, जुई बनकर, ज्योती गांधी ,सुनीता बोरा, नीता बोरकर, प्रियांका बोरकर, मेघना शेरकर , निर्मला गायकवाड, स्मिता लोणकर यांनी केले.
●गौरी बेनके( संस्थापिका: अंजनी महिला उद्योग): राजश्री बोरकर मागील चाळीस वर्षा पासून महिला सक्षमीकरणाचे
कार्य करत आहेत.इंद्रधनु महिला ग्रुप गरजू महिलांना रोजगार मिळवून देण्याचे काम करत आहे.मिसेस नारायणगाव सौंदर्य स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे. केवळ बाह्य सौंदर्य न पाहता महिलामधील विविध गुणांना स्पर्धेच्या माध्यमातून वाव मिळाला आहे.