
पुणे : अपुऱ्या पायाभूत सुविधा, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि अनेक वर्षे रखडत असलेली भरतीप्रक्रिया यावर मात करत राज्यातील विविध ग्राहक आयोगात दाखल झालेल्या ७७ टक्के तक्रारी आतापर्यंत निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित २३ टक्के तक्रारींवर अद्याप सुनावणी सुरू आहे. राज्यातील विविध आयोगांत आतापर्यंत तीन लाख ८२ हजार ५५४ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील दोन लाख ९५ हजार १८९ तक्रारी (७७.१६ टक्के) निकाली निघाल्या आहेत.