MSCE Pune Scholarship Exam Deadline Extended
sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास येत्या सोमवारपर्यंत (ता. १५) मुदतवाढ देण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळांना शाळा नोंदणी आणि नियमित शुल्कासह विद्यार्थी नोंदणीसाठी ही अंतिम मुदतवाढ आहे.