वीजग्राहकांनो सावधान ! बनावट मेसेजद्वारे होऊ शकते फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

msedcl Electricity consumers beware Fraud through fake messages crime alert pune

वीजग्राहकांनो सावधान ! बनावट मेसेजद्वारे होऊ शकते फसवणूक

पुणे : वीजबिल भरण्यासाठी तुम्हाला ‘एसएमएस’, व्हॉट्सॲपवर मेसेज किंवा कॉल येतोय का? येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण, याद्वारे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेली लिंक किंवा कोणतेही ॲप डाऊनलोड करू नका, वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे ॲप व www.mahadiscom.in या वेबसाईटचा वापर करा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

मेसेजमध्ये काय?

मागील महिन्याचे वीजबिल न भरल्याने आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असा बनावट मेसेज व्हॉट्सॲप किंवा ‘एसएमएस’वर पाठविण्यात येतो किंवा कॉलही येतो.

मेसेज कोणाला येतात?

मागील महिन्याचे वीजबिल न भरल्याने आज रात्री ९.३० वाजता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे ताबडतोब सोबत दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असा बनावट मेसेज व्हॉट्सॲप किंवा ‘एसएमएस’वर पाठविण्यात येतो किंवा कॉलही येतो.

मेसेजला प्रतिसाद दिल्यास...

जर तुम्ही या बनावट मेसेजना किंवा कॉलला प्रतिसाद दिला, तर केवळ ऑनलाइनद्वारे बिल भरण्यास सांगणे किंवा वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटची लिंक पाठविणे किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगणे. त्यानंतर मोबाईल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील शिल्लक रक्कम लंपास करण्यात येते.

महावितरणचा मेसेज कोणाला?

महावितरण कोणत्याही वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून असे ‘एसएमएस’ किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवीत नाही. ज्या वीजग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे, त्यांनाच केवळ संगणकीय प्रणालीद्वारे एसएमएस पाठविण्यात येतात.

खरा मेसेज कसा ओळखाल?

महावितरणकडून पाठविण्यात येणाऱ्या मेसेजचे सेंडर आयडी हे VM-MSEDCL, VK-MSEDCL, AM-MSEDCL, JM-MSEDCL असे आहेत. या अधिकृत मेसेजद्वारे कोणत्याही मोबाईल क्रमांकावर संपर्क साधणे, बँकेचा ओटीपी शेअर करणे, ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले जात नाही. तसेच, ‘व्हॉट्सॲप’ मेसेज पाठविले जात नाही.

‘एसएमएस’ -द्वारेच माहिती...

महावितरणकडून अधिकृत सेंडर आयडीद्वारे फक्त ‘एसएमएस’ पाठविले जातात. यामध्ये देखभाल व दुरुस्ती, वीजपुरवठा खंडित झाल्यास तो कधी पूर्ववत होणार याची माहिती, मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन, वीजबिलाची रक्कम, देय दिनांक, पुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती पाठविण्यात येते.

तक्रारीसाठी टोल फ्री क्र.

काही शंका अथवा तक्रारीसाठी वीजग्राहकांनी महावितरणच्या चोवीस तास सुरू असलेल्या १९१२, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.