Electric Shock : थेऊरमध्ये विजेचा शॉक बसून महावितरणच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

थेऊर येथील महावितरण कार्यालयात कंत्राटी सेवेत काम करत असणाऱ्या कामगाराचा विजेच्या तीव्र धक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
Ashok javalkar

Ashok javalkar

sakal

Updated on

- सुनील जगताप

थेऊर - थेऊर (ता. हवेली) येथील महावितरण कार्यालयात कंत्राटी सेवेत काम करत असणाऱ्या कामगाराचा विजेच्या तीव्र धक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली आहे. अशोक किसन जवळकर (वय-५२, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) असे विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.

त्यामुळे आळंदी म्हातोबाची आणि कुंजीरवाडी परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत असताना, महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परमिट घेतलेले असताना विद्युत रोहित्रावर अचानक वीज प्रवाह सुरू कसा झाला, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप कर्मचाऱ्याचा नाहक बळी गेला? असे गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com