esakal | महावितरण अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण

महावितरण अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: नवीन सदनिकांमध्ये वीजजोड बसविण्यासाठी खासगी व्यक्तीमार्फत आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण विभागाच्या एका अधिकाऱ्यासह एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. त्यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संदीप दशरथ भोसले (वय ३८) व हरी लिंबराज सूर्यवंशी (वय २२, रा. लोहगाव) असे अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी ५० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

‘एसीबी’ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी नवीन सदनिकांचे बांधकाम केलेले आहे. त्यांच्या तीन सदनिकांसाठी नवीन वीज मीटर जोडणी करायची होती, तर एक मीटर स्थलांतरित करायचा होता. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विश्रांतवाडी शाखेतील तंत्रज्ञ संदीप भोसले यांच्याकडे अर्ज केला होता. दरम्यान, भोसले याने संबंधित कामासाठी आठ हजार रुपयांची लाच मागितली होती.

''एसीबी’चे पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

loading image
go to top