MSRTC Server Down : दिवाळीची सुट्टी संपवून पुण्याकडे परतणाऱ्या हजारो प्रवाशांना एसटीचा ऑनलाइन आरक्षणातील बिघाडाचा फटका; वेबसाइट आणि ॲपचे सर्व्हर अचानक डाउन

MSRTC Online Booking Server Down During Diwali Return Rush : दिवाळीची सुट्टी संपवून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या ऑनलाइन तिकीट आरक्षणातील तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपचे सर्व्हर डाउन झाल्याने हजारो प्रवाशांना तिकिटांसाठी प्रतीक्षा करावी लागली. परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची गर्दी वाढली असतानाच ही अडचण निर्माण झाली.
MSRTC Online Booking Server Down

MSRTC Online Booking Server Down

esakal

Updated on: 

पुणे : दिवाळीची सुट्टी संपवून नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी पुन्हा पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना शनिवारी (ता. १४) मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला. राज्य परिवहन महामंडळाच्या ऑनलाइन तिकीट प्रणालीत अचानक बिघाड झाल्याने हजारो प्रवाशांना तिकिटासाठी ‘वेटिंग’वर राहावे लागले. ‘एसटी’चे अधिकृत मोबाइल ॲप आणि संकेतस्थळाचे सर्व्हर डाउन झाल्याने ऑनलाइन आरक्षणाचा पुरता बोजवारा उडाला होता.

Loading content, please wait...