esakal | Vidhan Sabha 2019 : शिवसेनेच्या कसबा मेळाव्यात मुक्ता टिळकांचे समर्थन

बोलून बातमी शोधा

mukta-tilak-kasaba.jpg

Vidhan Sabha 2019 : स्वारगेट : महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्यावतीने मेळावा आयोजित केला होता.

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेच्या कसबा मेळाव्यात मुक्ता टिळकांचे समर्थन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : स्वारगेट : महायुतीच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या प्रचारार्थ शिवसेना कसबा मतदारसंघाच्यावतीने मेळावा आयोजित केला होता.

त्यावेळी खासदार गिरीश बापट म्हणाले, ''युती धर्म पाळणे हे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून काही लोक दिशाभूल करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष न देता युतीधर्माचे पालन करून स्वच्छ व पारदर्शक सरकार निवडून देण्याचे काम शिवसैनिक नक्कीच करतील हा विश्वास मला कसबा मतदारसंघ म्हणून नक्कीच वाटतो.''

या मेळाव्याला शिवसेनेचे नेते अजय भोसले, पुणे शहर शिवसेना समनव्यक राजेंद्र शिंदे कसबा विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब मालुसरे, आरपीआयचे मंदार जोशी माजी नगरसेवक विजय मारटकर, भाजप कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेश येनपुरे, प्रमोद कोंढरे, विजय ठकार, युवा सेनेचे दीपक मारटकर, युवराज पारीख यांच्या सह अनेक जेष्ठ शिवसैनिक तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 

त्याच बरोबर महात्मा फुले वाडा, लोहिया नगर, पालखी विठोबा चौक, पांगुळ आळी, डुल्या मारुती चौक, कस्तुरे चौक, शितळा देवी मंदिर, फडके हौद, लाल महाल या ठिकाणी महिला आघाडी तर्फे प्रचार फेरी आयोजित केली आहे. यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या उपस्थित राहणार आहेत.