
पुणे : जागतिक आरोग्य संघटनेतर्फे घोषित (डब्ल्यूएचओ) 26 जून या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने दरवर्षी विविध जनजागृतीचे कार्यक्रम केले जाते. त्याच जागतिक मार्गदर्शक तत्वांनुसार आजच्या जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधत पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राने बारा तास मशाल प्रज्वलित ठेऊन व्यसनमुक्तीचा वज्रनिर्धार व्यक्त केला.
जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी 'योग्य माहिती - योग्य काळजी' अर्थात व्यसनाच्या आजाराची सखोल माहिती योग्य प्रकाराने मिळवणे, हे सुत्र घोषित केले आहे. दरम्यान सकाळी सहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सतत 12 तास मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या आवारात मुक्तांगणचा संपूर्ण कर्मचारी वर्ग एक एक करून मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला होता. व्यसनमुक्तीची एक अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी संपूर्ण १२ तास प्रत्येकजण एक मशाल घेऊन धावला आणि या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, "स्वतःची काळजी स्वतः घेणे अपेक्षित आहे. व्यसनाच्या आजाराची माहिती म्हणजे नक्की काय ? आजाराची सुरुवात कशी होते? आजार वाढत कसा जातो ? आजाराची निश्चित अवस्था कोणती असते आणि त्यातून बाहेर पडण्याकरता काय करावे लागते? हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आजाराचे विविध पैलू समजून घेणे आवश्यक आहे. गेली अनेक वर्ष आजारासंबंधी योग्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मुक्तांगण करीत आहे. दरवर्षी विविध शाळा, महाविद्यालये, वस्त्या, वाड्या, पाडे येथे जाऊन मुक्तांगणचे कार्यकर्ते आजाराची योग्य माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवत आहेत. गेल्याच वर्षी 100 हून अधिक कार्यक्रम झाले."
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यावर्षी कोविड-19 सारख्या गंभीर जागतिक महामारीच्या काळात संपूर्ण देशाला फार तीव्र स्वरूपाच्या शारीरिक आणि मानसिक परिणामांना सामोरे जावे लागत आहे. मनातील सततची चिंता, भिती आणि अनिश्चितता यासारख्या भावनांचे दडपण वाढून एकूणच संपूर्ण घराचे वातावरण नकारात्मक होऊन गेले आहे. अशा परिस्थितीत मुक्तांगणच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत आणि त्याबाबतीत घेण्याच्या प्रतिबंधकात्मक उपायांबद्दल लेखन केले व त्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाल्याचे आम्हाला दिसले.
अनेकांनी या लॉकडाऊनच्या काळात व्यसन थांबवले आणि सरकारने दारूबंदी उठवल्यानंतरही व्यसनमुक्त राहून एक उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.