Sangam-Valaki bridge : मुळा-मुठा व भीमा नदीला पूर, संगम-वाळकी पुल पाण्याखाली; पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट

मुळा-मुठा व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे संगम-वाळकी येथील पूल पाण्याखाली; वाळकी-देलवडीचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थ, शेतकरी व कामगारांची मोठी अडचण
The floodwaters have disrupted connectivity between Valki and Delwadi villages, while authorities have urged residents to remain cautious.

The floodwaters have disrupted connectivity between Valki and Delwadi villages, while authorities have urged residents to remain cautious.

Sakal

Updated on

प्रकाश शेलार

खुटबाव (पुणे) : मुळा मुठा नदीला आलेल्या पुरामुळे संगम वाळकी( ता . दौंड) येथील पुल यावर्षी पावसाळी हंगामामध्ये प्रथमच पाण्याखाली गेला आहे .त्यामुळे वाळकी व देलवडीचा संपर्क तुटला आहे. गेली सलग चार दिवस घाटमाथ्यावर व धरण परीसरात झालेल्या मुसळधार पाऊसामुळे मुळा मुठा नदी व भीमा नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे .यामुळे सोमवार दि. ६ रोजी सकाळपासुनच पुलावरुन पाणी वाहु लागले.याशिवाय दौंड तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले होते. नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांनी सकाळीच विद्युत पंप नदीकाठच्या परिसरातून सुरक्षित स्थळे हलवले. गेली ३ दिवस दौंड तालुक्यात दिवसभर पाऊस असल्याने सर्व गुऱ्हाळघरे व वीट भट्टी व्यवसाय बंद होता. शेतातील सर्व कामे बंद होती. त्यामुळे शेतमजूर, परप्रांतीय कामगार यांनी दिवसभर घरीच राहाणे पसंत केले. अनेक नदीकाठचे ग्रामस्थ आज दिवसभर मुळा मुठा व भीमा नदीची पाणी पातळी पाहण्यासाठी नदीकिनारी गर्दी करत होते. पारगाव येथील पुलावर भिमाचे पाणी पाहण्यासाठी विशेष गर्दी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com