

The flooding has disrupted connectivity between several villages and caused losses to farmers along the riverbank.
Sakal
सुनील जगताप,
उरुळी कांचन : मुळा मुठा नदीला आलेल्या पुरामुळे कोरेगांव मुळ(ता.हवेली) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पुल जो या भागातील यावर्षी पावसाळी हंगामामध्ये प्रथमच पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे उरुळी व कोरेगांव मुळ या गावांसी असलेला बिवरी,शिरसवडी,वाडे बोल्हाई,अष्ठापूर,बुर्केगांव,डोंगरगांव,पिंपरी सांडस आदी गावांचा तसेच नगर रोड ते पुणे सोलापूर रोडचा संपर्क तुटला आहे.शाळा कॉलेज बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना आज याची अडचण झाली नाही मात्र पाऊस असाच सुरु राहिला आणि पूर ओसरला नाही तर या पुलावरून होणारे दळणवळण कोलमडून जाणार आहे.