

Mula-Mutha River Water Turns Toxic
Sakal
सुनील जगताप
थेऊर : पुणे शहरातून दौंडकडे जाणारी मुळा-मुठा नदीचे पाणी फेसाळले असून जलपर्णी फोफावली तर फळभाज्या, पालेभाज्या दुषित झाल्याने सर्वसामन्यांचे आरोग्य धोक्यात गेल्याने नदी काठच्या गावात काळजी वाढत असून जनता बेचैन झाली आहे.या प्रदूषणावर उपाय योजना होत नाहीच पण दिवसेंदिवस पाणी आणखी खराब होत असून नदी अतिप्रदुषित झाली आहे. गेल्या काही दिवसापासून येथील विश्वराज बंधा-याजवळ पाण्यावर फेसाचा सुमारे एक ते दीड फूट तवंग तरंगताना दिसून येत आहे.