Pune Mula-Mutha Indrayani Pollution: मुळा-मुठा व इंद्रायणी नदीत केमिकलयुक्त मैलामुळे जलपर्णी-मच्छरांचा कहर

मुळा-मुठा व इंद्रायणी नदीत केमिकलयुक्त मैलापाण्यामुळे जलपर्णी-मच्छरांचा प्रादुर्भाव; आरोग्य, शेती व पशुधन धोक्यात, ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा
मुळा-मुठा आणि इंद्रायणी नदीतील रासायनिक व सांडपाण्यामुळे वाढलेली जलपर्णी आणि डासांच्या प्रादुर्भावाविरोधात हवेली-दौंडमधील ग्रामस्थांनी १ मे पासून नदीतच उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

मुळा-मुठा आणि इंद्रायणी नदीतील रासायनिक व सांडपाण्यामुळे वाढलेली जलपर्णी आणि डासांच्या प्रादुर्भावाविरोधात हवेली-दौंडमधील ग्रामस्थांनी १ मे पासून नदीतच उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळी कांचन : पुणे जिल्ह्यातील मुळा मुठा व इंद्रायणी या नदीपात्रातून सोडलेल्या केमिकल युक्त व मैला मिश्रित पाण्यामुळे वाढणाऱ्या जलपर्णी व मच्छरांमुळे हवेली व दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांचे आरोग्य,शेती व पशुधन उद्योग धोक्यात आलेले आहेत.यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.अन्यथा १ मे २०२६ रोजी असणाऱ्या महाराष्ट्र दिनापासून या नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीवर बसून आमरण उपोषण करण्याचा इशारा हिंगणगावचे माजी सरपंच अंकुश कोतवाल व मुळा मुळा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com