

कोळवण, ता. १७ : शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने मुळशी तालुक्यातील प्रमुख पिकांचे २० टक्के सर्वेक्षण व ‘ग्राउंड ट्रुथिंग’ करून म्हणजेच प्रत्यक्ष पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मंडळनिहाय अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आमदार शंकर मांडेकर यांनी दिली.
अपुऱ्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिके सुद्धा हातची जाणार आहेत व पाणी टंचाई सुद्धा आत्तापासूनच जाणवत आहे. तरीसुध्दा तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नाही. तालुक्यातील शेतकरी बांधवांना शासनाच्या दुष्काळी सवलती लागू झाल्या नाहीत. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून मांडेकर यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वगळलेल्या मुळशी तालुक्याचा ‘ट्रिगर-३’ अंतर्गत समावेश व्हावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांची समक्ष भेट घेऊन तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती माहिती दिली होती.
राज्य शासनाने आता नव्याने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत व पंचनामे पूर्ण झाल्यानंतर त्या अहवालाच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील दुष्काळाची वास्तविक परिस्थिती समोर येईल आणि तालुक्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळग्रस्त तालुका म्हणून सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा होईल हा विश्वास आहे, असे आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले.
तालुक्यातील स्थिती
महिना.......पर्जन्यमान.......सरासरी (टक्के)
जून.......८८.५०.......२७८.६०
जुलै.......११४८.५०.......६४५.५०
ऑगस्ट.......२३६.२०.......४६३.४०
सप्टेंबर.......९८.४०.......१८५.७०
१५ ऑक्टोबरपर्यंत.......००.......८२.१०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.