

Mulshi Aadhaar Centres Face Operational Issues as 1246 Students Await Updates Before September 30 Education Deadline
esakal
-पांडुरंग साठे
कोळवण: मुळशी तालुक्यातील आधार केंद्रांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, प्राथमिक शाळेतील तब्बल ९३४ विद्यार्थी आधार संदर्भातील कामासाठी प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. तर अंगणवाडी मुळशीमधील तब्बल ३१५ आधार कार्ड संबंधित काम पूर्ण नसल्यामुळे शासनाच्या लाभांपासून वंचित आहेत. शिक्षण संचालनालयाने ३० सप्टेंबरपर्यंत संच मान्यतेसाठी 'आधार वैध' असणे सक्तीचे केले असताना, मुळशीतील प्रशासकीय उदासिनतेमुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अधांतरी लटकले आहे.