Pune Rural News : मुळशी तालुक्यातील पारंपरिक आंबेमोहोर भाताचे उत्पादन घटले; इंद्रायणी तांदळाची लोकप्रियता, मजुरांची कमतरता आणि कष्टाची कापणी ठरतेय प्रमुख कारणे

Traditional Ambemohar Rice Cultivation Declining in Mulshi Taluka : मुळशी तालुक्यात पारंपरिक आंबेमोहोर भाताचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. इंद्रायणी तांदळाची वाढती लोकप्रियता, कमी बाजारभाव, कष्टाची शेती, मजुरांची कमतरता आणि बदलत्या शेतीपद्धतीमुळे शेतकरी आंबेमोहोर लागवडीकडे पाठ फिरवत आहेत.
Traditional Ambemohar Rice Cultivation Declining in Mulshi Taluka

Traditional Ambemohar Rice Cultivation Declining in Mulshi Taluka

esakal

Updated on: 

पांडुरंग साठे

कोळवण : मुळशी तालुक्यात आंबेमोहोर तांदळाचा दरवळ जवळपास लोपण्याच्या मार्गावर असल्याचे पाहायला मिळते आहे. आंबेमोहोर भाताचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी उदासीन असल्याचे दिसून येत आहे याची कारणे सुद्धा बरीच आहेत. त्यामध्ये मागील तीन दशकांपासून अधिक काळ सुरु असलेले इंद्रायणी भाताने या आंबेमोहोर भाताची जागा काबीज केली आहे. इंद्रायणी तांदळाला असलेली चव सुगंध यामुळे इंद्रायणी तांदूळ अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे या तांदळास मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे.

Loading content, please wait...