

Mulshi Water for Pune: Two Options
Sakal
पुणे : मुळशी धरणातील पाणी पुणे शहरात आणण्यासाठी दोन पर्याय पुढे आले आहेत. मुळशी धरणातून बोगद्याद्वारे ते पाणी खडकवासला धरणात आणणे हा एक, तर मुळशी ते खडकवासला धरणदरम्यान जलवाहिनी टाकणे असा दुसरा पर्याय. या दोन्ही पर्यायासंदर्भात टाटा कंपनी आणि जलसंपदा विभाग यांच्यात बैठकीनंतरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्यास मान्यता मिळाली, तर पहिल्या टप्प्यात या मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी शहरासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.