Pune Kolad Highway Closed: मुळशीतील मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; पुणे–कोलाड महामार्ग १५ दिवसांसाठी बंद

मुळशी धरण परिसरात अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; डोंगरवाडी येथे रस्त्याचा भराव वाहून गेल्याने पुणे–कोलाड महामार्ग किमान १५ दिवसांसाठी बंद, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
Authorities have warned that repairs may take around 15 days, while rescue and road clearance operations continue in the affected areas.

Authorities have warned that repairs may take around 15 days, while rescue and road clearance operations continue in the affected areas.

Sakal

Updated on

माले : मुळशी धरण परिसरात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाने सोमवारी जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले. ठिकठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, झाडे उन्मळून पडणे आणि पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. डोंगरवाडी (ता. मुळशी) येथे रस्त्याचा भराव वाहून गेल्याने पौड- माणगाव (पुणे- कोलाड) महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, हा मार्ग दुरुस्तीसाठी किमान १५ दिवस बंद राहण्याची शक्यता असल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com