

पौड, ता. ५ : पळसे (ता. मुळशी) येथे १५ वर्षांपूर्वी मध्यरात्री एका दाम्पत्याला शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सलमान शेरखान मुलाणी (वय ३६), बालाजी सूर्यकांत एकुरगे (वय ३८) आणि धनाजी शिवाजी जाधव (वय ३५, तिघेही रा. पौड, ता. मुळशी) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी संजय शिवाजी वाईकर आणि आकाश बजरंग टाक यांचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला आहे. १० ऑक्टोबर २०११ला रात्री पावणेबाराच्या सुमारास फिर्यादी संजय राधाकृष्ण परदेशी (रा. जालगाव, जि. रत्नागिरी) हे पत्नीसह कारने जात असताना पळसे धबधब्याजवळ आरोपींनी दोन दुचाकी आडव्या लावून त्यांना थांबवले. आरोपींनी शस्त्राचा धाक दाखवून ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाइल आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५८ हजारांचा ऐवज लुटला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या मार्गदर्शनाखाली पौड पोलिसांनी तपास करून पाचही आरोपींना अटक केली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांनी पुराव्यांच्या आधारे हा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे प्रभावी युक्तिवाद करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.