मुळशीत कोरोनाबाधितांचा आकडा सरकतोय एक हजाराकडे

राजेंद्र मारणे
Monday, 17 August 2020

तालुक्यातील पूर्व भागातील मोठ्या पंधरा गावातून नियमित करोना रूग्ण सापडत आहेत. या गावांनी स्वताहून लाँगडाऊन पाळला होता. त्यावेळी काही प्रमाण कमी झाले होते. तालुक्यातील बावधन, भूगाव, भुकूम, पिरंगुट, उरवडे, घोटावडे, भरे,नांदे, म्हाळुंगे,  सूस, माण, हिंजवडी, मारूंजी, नेरे, भरे, कासारअंबोली, कासारसाई गावांतून आत्ता पर्यंत ज्यास्त रूग्ण सापडले आहेत. 

भुकूम : मुळशी तालुक्यात दररोज सापडणारे कोरोना रूग्णांची संख्या कमी होत नाही. सध्या आत्ता पर्यंतची संख्या 896 असून थोड्याच दिवसात एक हजार पर्यंत जाईल अशी परिस्थिती आहे. दरम्यान तालुक्यातील पंधरा गावातून रूग्ण सापडण्याचे प्रमाण कायम असून आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.      
                      
...तर हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करा; उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश​

तालुक्यातील पूर्व भागातील मोठ्या पंधरा गावातून नियमित करोना रूग्ण सापडत आहेत. या गावांनी स्वताहून लाँगडाऊन पाळला होता. त्यावेळी काही प्रमाण कमी झाले होते. तालुक्यातील बावधन, भूगाव, भुकूम, पिरंगुट, उरवडे, घोटावडे, भरे,नांदे, म्हाळुंगे,  सूस, माण, हिंजवडी, मारूंजी, नेरे, भरे, कासारअंबोली, कासारसाई गावांतून आत्ता पर्यंत ज्यास्त रूग्ण सापडले आहेत. गावातील नागरिकांचा पुणे व पिंपरी चिंचवड शहरांशी दररोजचा संबध येत असतो. तसेच सोशल डिस्टंन्स कोणत्याच गावातील बाजारपेठेत पाळले जात नाही. करोनामुळे आत्ता पर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून अतिदक्षता विभागात पाचजण तर अत्यावस्थ एकजण असून ही बाब गंभीर आहे.

मोठी बातमी : पुण्यात कोरोना रुग्णांबाबत नोंदविले गेलेत दोन रेकॉर्ड; वाचा सविस्तर​ 

रूग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी रूग्ण सापडणार नाही, कोरोना आटोक्यात येईल यासाठी प्रशासन व ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. पश्चिम भागातील नागरिकांचा नेहमी या गावांशी संपर्क असतो. त्यामुृळे करोना लहान गावापर्यंत पोहचला आहे. अशा गावातून नेहमी रूग्ण सापडू लागले आहेत. 

पुणे जिल्ह्यातील नागरिकांनो सतर्क राहा; हवामान विभागानं दिलाय 'ऑरेंज अलर्ट'!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In mulshi the number of corona positive is reaching on the thousands