

Rice crops in Mulshi are drying due to prolonged rainfall shortage, leaving farmers dependent on return showers.
esakal
पांडुरंग साठे कोळवण, : मुळशी तालुक्यात प्रमुख खरीप हंगामातील मुख्य पिक म्हणून भात पिक उत्पादन घेतले जाते तालुक्यातील साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावर या वर्षी भात पिक लागवड करण्यात आली आहे जून महिन्यात पाऊस पडला नाही यामुळे भात पुनर्लागवड एक महिना उशिराने झाली जूलै व आॅगस्ट महिन्यात फक्त पाऊस पडला परंतु सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे दोन तीन दिवस वगळता महिनाभर पाऊस पडला नाही परिणामी डोंगर उतारावरील ओढे नाले आटले आहेत