NDA Pashan Road : मुंबई--बंगळूर महामार्गावरील एनडीए पाषाण रस्ता वाहतुकीसाठी बंद

मुंबई--बंगळूर महामार्गावर चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असून, एनडीए पाषाण रस्त्यावर गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे.
Chandani Chowk
Chandani ChowkSakal

पुणे - मुंबई--बंगळूर महामार्गावर चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असून, एनडीए पाषाण रस्त्यावर गर्डर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एनडीए पाषाण रस्ता मंगळवारपासून (ता. ४) येत्या १५ जुलैपर्यंत रात्री १२.३० ते ३.३० या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. याबाबतचे परिपत्रक शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी काढले आहे.

पर्यायी मार्ग- (जड वाहने वगळून फक्त हलकी आणि चारचाकी वाहनांसाठी)

- सातारा ते मुंबई महामार्गावरील वाहतूक वेदभवन सेवा रस्त्याने पुढे मुंबईकडे इच्छितस्थळी जाईल.

- मुंबई ते सातारा वाहतूक पाषाण रस्त्याने वळवून रॅम्प क्रमांक सहावरून वारजेकडे इच्छितस्थळी जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com