अपघात रोखण्यासाठी उपाययोजना; मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चित्र

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

या पार्श्‍वभूमीवर अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान विविध उपयोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

धायरी - मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून सतत अपघात होत आहेत. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणवर टीकेची झोड उठली. या पार्श्‍वभूमीवर अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली असून कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यान विविध उपयोजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

कात्रज नवीन बोगदा ते नवले पुलादरम्यानच्या मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी आवाज उठविला.  महामार्गावरील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघात रोखण्यासाठी उपयोजना राबविण्यास सुरूवात केली आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

महामार्गावरील तीव्र उतारावर एकहजार पेक्षा जास्त स्टड लाइट बसवण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रम्बलर्स, वेग मर्यादेचे फलक लावण्यात आले आहेत. वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहने हळू चालवा, अपघात प्रवण क्षेत्र असल्याने वाहने सावकाश चालवा, असे संदेश देणारे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अकरावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनो, दुसऱ्या संवर्गातील ऍडमिशनसाठी उद्यापर्यंत मुदत​

महामार्गावरील अपघात कमी होण्यासाठी आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी उपाययोजना केल्या आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. 
-सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai-Bangalore National Highway