Mumbai : "पुढील वर्षी भाविकांना मिळणार फर्निक्युलर ट्रॉलीची सुविधा" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shinde

Mumbai : "पुढील वर्षी भाविकांना मिळणार फर्निक्युलर ट्रॉलीची सुविधा"

डोंबिवली- श्री मलंग गडावर भाविकांना जाता यावे म्हणून गडावर फर्निक्युलर ट्रॉलीची व्यवस्था करण्यात येत आहे. हे काम सुरू असून पुढील वर्षी या सुविधेचा लाभ भाविकांना घेता येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

रविवारी श्री मलंग गडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुढील वर्षी फिनिक्युलेर ट्रॉलीचे काम पूर्ण होईल.

तसेच पुण्यातील कसबा पेठ निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आपण विरोधी पक्षनेते अजित पवार,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच काँग्रेस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलणं केलं असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. अंधेरी पोटनिवडणुकीत जशी बिनविरोध झाली होती त्याच प्रमाणे ही सुद्धा निवडणूक बिनविरोध व्हावी असं एकनाथ शिंदे म्हणाले.