

प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी ‘ग्रीन बाँड’
उत्पन्नवाढीसाठी मुंबई महापालिकेचा निर्णय : अश्विनी भिडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : ‘महापालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत ‘ग्रीन बाँड’ मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे निधी उपलब्ध होणार असून, पर्यावरणपूरक मोठे प्रकल्प हाती घेणे शक्य होणार आहे,’ अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. तसेच सध्या ‘एमएमआर’ क्षेत्राची अर्थव्यवस्था १६० मिलियन डॉलर असून, ती ३०० मिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे नियोजन असल्याचे भिडे यांनी मंगळवारी सांगितले.
महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यासाठी खर्चाचे नियोजन करण्यात येते, परंतु गारगाई धरण प्रकल्प, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी उपलब्ध करून देणे, समुद्राचे खारे पाणी गोडे करणे, वर्सोवा ते दहिसर उन्नत मार्ग असे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या खर्चासाठी ‘ग्रीन बॉण्ड’ डिसेंबरपर्यंत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अश्विनी भिडे यांनी सांगितले. ग्रीन बॉण्ड्स जारी करण्यासाठी आवश्यक असलेल्या क्रेडिट रेटिंग प्रक्रियेसाठी संस्थेचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक व दीर्घकालीन पायाभूत प्रकल्पांसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने महापालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.