Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

घटस्फोटाच्या निकालाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पती-पत्नीचे वैवाहिक नाते अद्याप कायम आहे.
Mumbai High Court

Mumbai High court

Esakal

Updated on

पुणे - घटस्फोटाच्या निकालाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पती-पत्नीचे वैवाहिक नाते अद्याप कायम आहे. त्यामुळे पत्नीला वैवाहिक घरातून बेदखल करता येणार नाही. गेल्या पाच वर्षांपासून ती राहत असलेल्या घरातील तिच्या ताब्यात पोलिसांसह कोणत्याही यंत्रणेने हस्तक्षेप करू नये, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष एस. चव्हाण यांच्या खंडपीठाने पुण्यातील एका महिलेने दाखल केलेल्या अपिलावर हा आदेश दिला. येथील कौटुंबिक न्यायालयाने १६ एप्रिलला पतीची घटस्फोटाची याचिका मंजूर केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com