esakal | कल्याण पूर्वमध्ये कचऱ्याचे साम्राज्य... नागरिक हैराण..
sakal

बोलून बातमी शोधा

कचऱ्याचे साम्राज्य कल्याण

सामाजिक संस्था 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी काढणार मूक मोर्चा...

कल्याण पूर्वमध्ये कचऱ्याचे साम्राज्य... नागरिक हैराण..

sakal_logo
By
रवींद्र खरात

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील कचरा कल्याण पश्चिम मधील आधारवाडी डंपिंग ग्राऊंड येथे टाकला जातो. त्याची ही क्षमता संपली असून तेथे प्रतिदिन शहरातील कचरा गोळा केलेला टाकण्यासाठी गेलेल्या गाड्या परत 2 ते 3 तास परत न आल्याने कल्याण पूर्व सहित पालिका हद्दीतील कचरा कुंडया ओसंडून वाहत असल्याने कल्याण पूर्वमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून मोठी जीवित हानी झाल्यावर पालिका प्रशासन जागे होणार काय असा सवाल केला जात असून कल्याण पूर्व मधील स्वराज्य सामाजिक संघटनाच्या वतीने 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात येणार आहे .

सोमवार ता 18 सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून कल्याण पूर्व मधील अनेक प्रभागात सकाळच्या प्रतिनिधी ने फेरफटका मारला, एक तासाहून अधिक काळ अनेक ठिकाणी पाहणी केली, सुरुवात कल्याण पूर्व मधील दादासाहेब गायकवाड क्रीडांगण पासून सुरुवात केली तर सर्व ठिकाणी कचराच कचरा दिसून आला आहे . 

कचरा साम्राज्य असलेले ठिकाण...
कल्याण पूर्व दादासाहेब गायकवाड क्रीडांगण समोर रस्त्यावर कचरा होता पुढे जाताना गायत्री विद्यालय समोर मैदान मध्ये तर पुढे जाताच जुने जनता सहकारी बँकच्या इमारत समोर, पुढे विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक जवळ एक भला मोठा नाल्याजवळ कचरा आहे, सकाळी अक्षरशा नागरिकांना नाकावर रुमाल ठेवून प्रवास करावा लागतो, पुढे खडगोलवली मध्ये परिस्थिती तीच होती पुढे आमराई मध्ये शाळा समोर दलदल झाली असून तेथे एका मंडळाला लिहावे लागले नवरात्र साजरी करण्यात येणार असल्याने कोणी कचरा टाकू नये तरीही तेथे कचरा साठला असून कचरा न उचलत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत पुढे कल्याण हाजीमलंग रस्त्यावर तर कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड झाले असून समोर रस्त्यावरच कचरा दिसून ही तो उचला जात नसल्याचा संताप नागरिक करत आहेत .नवीन नवीन पालिका आयुक्त येतात कचरा विषयावर मिटिंग घेतात मात्र कचरा प्रश्न काही सुटत नाही तीच परिस्थिती पालिका आयुक्त पी वेलरासु यांची झाली असून मीटिंग वर मीटिंग सुरू असून कचरा प्रश्न सोडण्यात पालिका आयुक्त पी वेलरासु यांची टीम अपयशी ठरली आहे .

कचरा प्रश्न बिकट असून आम्हाला 
सुविधा नाही तर कर नाही ...आम्ही कर देऊन ही आम्हाला सुविधा देत नसल्याने आम्ही महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता मुकमोर्चा काढून निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती स्वराज्य सामाजिक संस्था अध्यक्ष प्रथमेश सांवत यांनी सकाळला दिली . 

कचराविषयी न्यायालयीन लढाई लढत आहे, पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे, दिल्ली सारखी मोठी दुर्घटना घडल्यावर ह्यांचे डोळे उघडणार का असा सवाल करत नागरिकांच्या जन आंदोलनास माझा पाठींबा असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते कोस्तुभ गोखले यांनी दिली. काल रविवार असल्याने 50 टक्के कर्मचारी वर्ग रजेवर असतात, दोन सत्रात कचरा उचलला जातो, कचरा उचलला जात नाही अशी माहिती द्यावी ती का उचलला जात नाही, काय समस्या आहे ती दूर करण्याचा प्रयन्त करू  अशी माहिती पालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर यांनी दिली. 

कल्याण पूर्वमध्ये 25 वार्ड आहेत, मात्र कचरा उचलण्यासाठी घंटागाडी आणि कर्मचारी वर्ग अपुरे आहेत, प्रशासन यात नियोजन करण्यात अपयशी ठरली आहे, प्रत्येक महासभेत मी विषय मांडतो मात्र घनकचरा विभाग का लक्ष्य देत नाही हा प्रश्न पडला आहे, कल्याण पूर्व मध्ये इमारत पेक्षा चाळीचे प्रमाण जास्त असून गटार नाले उघडे असल्याने कचरा प्रश्न गँभीर बनत असल्याची खंत नगरसेवक निलेश शिंदे यांनी व्यक्त केली .

loading image