

Rising Air Traffic in Mumbai Pune Prompts Review of NCC Air Training Locations With NDA and Kolhapur Being Studied
esakal
-प्रज्वल रामटेके
पुणे : मुंबई-पुणे परिसरातील हवाई क्षेत्रावरील वाढता ताण आणि उड्डाण सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) हवाई प्रशिक्षणाच्या काही सुविधा अन्य ठिकाणी हलविण्याचा विचार सुरू आहे. मुंबईतील लहान विमानांच्या प्रशिक्षणासाठी पर्यायी ठिकाणांचा अभ्यास केला जात असून, त्यामध्ये खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), कोल्हापूरसह अन्य ठिकाणांचा विचार केला जात आहे, अशी माहिती एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी दिली.