पुणे, मुंबईसह 14 जिल्हे रेड झोन; निर्बंधांबाबत काय निर्णय?

mumbai pune among red zones designated by central government
mumbai pune among red zones designated by central government

पुणे : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणानुसार देशातील 733 जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी केली आहे. यात देशातील 130 जिल्हे रेड झोनमध्ये असून, महाराष्ट्रातील पुणे, मुंबईसह 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.  लॉकडाउनचा कालावधी 3 मे रोजी संपल्यानंतर या जिल्ह्यांत निर्बंध लागू राहणार आहेत. याचवेळी ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील तर ग्रीन झोनमध्ये निर्बंध अतिशय कमी प्रमाणात असतील.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, मुंबई, कोलकता, हैदराबाद, बंगळूर आणि अहमदाबाद या महानगरांमध्ये लॉकडाउनचा कालावधी संपल्यानंतरही निर्बंध असणार आहेत. राज्यात कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक मुंबई आणि पुण्यात झाला आहे. येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील निर्बंध 3 मेनंतर आणखी वाढतील. मुंबई, पुण्यासह ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, अकोला, जळगाव आणि रायगड हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. 


जिल्हानिहाय झोन ः 
मुंबई - रेड झोन 
पुणे - रेड झोन 
ठाणे - रेड झोन 
नाशिक- रेड झोन 
पालघर - रेड झोन 
नागपूर - रेड झोन 
सोलापूर - रेड झोन 
यवतमाळ - रेड झोन 
औरंगाबाद - रेड झोन 
सातारा - रेड झोन 
धुळे - रेड झोन 
अकोला - रेड झोन 
जळगाव - रेड झोन 
मुंबई उपनगर - रेड झोन 

रायगड - ऑरेंज झोन 
नगर - ऑरेंज झोन 
अमरावती - ऑरेंज झोन 
बुलडाणा - ऑरेंज झोन 
नंदूरबार - ऑरेंज झोन 
कोल्हापूर - ऑरेंज झोन 
हिंगोली - ऑरेंज झोन 
रत्नागिरी - ऑरेंज झोन 
जालना - ऑरेंज झोन 
नांदेड - ऑरेंज झोन 
चंद्रपूर - ऑरेंज झोन 
परभणी - ऑरेंज झोन 
सांगली - ऑरेंज झोन 
लातूर - ऑरेंज झोन 
भंडारा - ऑरेंज झोन 
बीड - ऑरेंज झोन 

उस्मानाबाद - ग्रीन झोन 
वाशीम - ग्रीन झोन 
सिंधुदुर्ग - ग्रीन झोन 
गोंदिया - ग्रीन झोन 
गडचिरोली - ग्रीन झोन 
 वर्धा - ग्रीन झोन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com