
पुणे: वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची सूचना! मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. आयटीएमएस प्रणाली अंतर्गत या मार्गावर दोन्ही बाजूंनी ५२ ठिकाणी हे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रणालीद्वारे वाहनांचा वेग, सीटबेल्टचा वापर, लेनची शिस्त, आणि मोबाईलचा वापर आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना त्वरित ई-चलान जारी करण्यात येते.