

Mumbai Pune Expressway Accident
sakal
लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात वायुगळती झालेला टँकर गुरुवारी (ता. ५) मध्यरात्री एकच्या सुमारास हटवण्यात आला. त्यानंतर दीडच्या सुमारास मुंबईकडे जाणारी मार्गिका सुरू करण्यात आली. मात्र, अपघातामुळे निर्माण झालेली परिस्थिती, वाहनांची गर्दी, दूरवर रांगांमुळे वाहतूक संथ गतीनेच सुरू होती. दरम्यान, मंगळवारी (ता. ३) सायंकाळी साडेपाचपासून विस्कळित झालेली वाहतूक तब्बल ४४ तासांनंतर म्हणजेच गुरुवारी दुपारनंतर पूर्वपदावर आली.